आठवतो भूतकाळ जेव्हा
मनात काहूर दाटतयं
हल्लीच्या या दुनियेमध्ये
खूपच अस्वस्थ वाटतयं
हल्लीच्या या दुनियेमध्ये
खूपच अस्वस्थ वाटतयं
मुक्त स्वच्छंदी पक्षासारखं
होत बालपण अवघं
या फांदीवरून त्या फांदीवर
खेळत रहायचे चार-चौघं
सांज-सकाळी मधुर नाद
घुमत राही चिरंतन
मंजूळ कल्लोळ पाखरांचा
जसं चाले विचार मंथन
घातली भुरळ कोणी
मग फसत गेले सारे
नातीगोती झाली अंधूक
घुमू लागले स्वार्थी वारे
प्रेम भावना मन बाकी
अगदी नगण्य झाले
मिसळून धुळीस सारे
मात्र देखावे उभे केले
मिळेल मोकळा श्वास
इथे लढतोय प्रत्येक जण
होईल अंतःकरण शांत
असे शोधतोय दोन क्षण