तुमच्यासाठी भाकरी तवा
जणू सारीपाटाचा खेळ
आम्ही पारावर चाखत राहतो जणू सारीपाटाचा खेळ
फोल विचाराची भेळ
तुमचीच नजर पायापाशी
कसा जमेल मेळ?
विकास फक्त कागदावर
अन टाळून न्यायची वेळ
कपडे, गमछे, रंग वेगळे
नीती मात्र सेम
बदलत राहायचे सोईने
ठरवून असतो गेम
भाऊ, दादाचे कट लावण्यात
हे सारी जिंदगी घालतय
हाती-पदरी नसतंच काही
फक्त कार्यकर्ताच असतंय
किती उचलल्या सतरंज्या
पर्वा कुणालाच नसते
इथे तुमच्या आयुष्याची
किंमत मात्र शून्य असते