Sunday, 9 February 2025

माझ्या कविता 74

कसं काय जाणे आता

जिवलग फितुर झाली

एका जिवाची पाखरं

आज घरटं सोडून गेली


उगाच मोह मृगजळात

अगदीच हरवून गेली

निःस्वार्थ, निखळ प्रेमाची

किंमत बाकी शून्य झाली


सोडून गेलेत जाणारे

कधीच न परतण्यासाठी

का जगावं आठवणीत?

जे नव्हतेच आपल्यासाठी