Friday, 17 January 2020

माझ्या कविता 44

कधी नव्हतेच मुळात एकटी
 होतेच प्रेम आणि आशीर्वाद
 हो! लढणार पुन्हा एकदा
 फक्त असणार तुमची साथ

 भरते स्फुरण माझ्यात
 हर एक थोर व्यक्ती
 हो! लढेल मीही आता
 पुन्हा एकवटून शक्ती

 झाले फितूर बहुत
 परवा कुणास नाही
 हर जन बंधू माझा
 मागे हटणार नाही

 येऊ दे आसमंत वादळ
 ही ज्योत तेवणार आहे
 हो! लढेल पुन्हा एकदा
 फक्त कमळ फुलणार आहे

माझ्या कविता 43

सोडता चाड जेव्हा तुम्ही 
डोळ्यात धुंदी आल्यावर
बोलावं लागतं रोखठोक
असं अगतिक झाल्यावर

स्वतःची पोळी भाजण्यात
झालात तुम्ही मग्न
बघा जरा त्याच्याकडे
जणू संसार पडलाय भग्न

करत असता कैक वायदे
म्हणे मदत आम्ही देणार
भेटतील खुर्चीवाल्यास फायदे
बरं का! अशीच नोंद होणार

तुम्ही करा चर्चा वाऱ्या 
बंद दाराच्या आत 
थांबवा सगळ्या भूलथापा
फक्त होतो सतत घात

वाटतं कधी आता 
नकोच तुमचा पैसा 
वाट पाहून थकलो आहे 
आभासी मृगजळ जैसा

माझ्या कविता 41

हर्षित रम्य
तेजोमय
रवि किरणात
झुलते, फुलते 
रानफुल

मंद वारा
 करतो लगट
भरतो आनंद
ह्रदयी आरपार
मोहते, खेळते
रानफुल

विसरून दुःख
जगवते कधी
भरवते चेतना
रानफूल

असेल गंधहिन
मनमोहक
ऊभे कणखर
स्वच्छंदी
रानफुल