Friday, 17 January 2020

माझ्या कविता 43

सोडता चाड जेव्हा तुम्ही 
डोळ्यात धुंदी आल्यावर
बोलावं लागतं रोखठोक
असं अगतिक झाल्यावर

स्वतःची पोळी भाजण्यात
झालात तुम्ही मग्न
बघा जरा त्याच्याकडे
जणू संसार पडलाय भग्न

करत असता कैक वायदे
म्हणे मदत आम्ही देणार
भेटतील खुर्चीवाल्यास फायदे
बरं का! अशीच नोंद होणार

तुम्ही करा चर्चा वाऱ्या 
बंद दाराच्या आत 
थांबवा सगळ्या भूलथापा
फक्त होतो सतत घात

वाटतं कधी आता 
नकोच तुमचा पैसा 
वाट पाहून थकलो आहे 
आभासी मृगजळ जैसा

No comments:

Post a Comment