Sunday, 24 May 2020

माझ्या कविता 50

एकेकाळी माझं सुद्धा
प्रेम नावाचं गाव होतं
रेखाटलेल्या शब्दरचनेत
फक्त तुझंच नाव होतं

गेलोच तुझ्या वाटेवरून
लपूनछपून पाहणं होतं
बरसणार्‍या वर्षा सरीत
मुक्तपणे भिजणं होतं
फुलासारखं बहरणं कधी
भुंग्यापरी फिरणं होतं
सुख दु:खाच्या क्षणोक्षणी
हसणं कधी रडणं होतं

भेटलो असतो एकदा तरी
नशीब मात्र रिक्त होतं
रेखाटलेल्या शब्दरचनेत
फक्त तुझंच नाव होतं
                

Saturday, 16 May 2020

माझ्या कविता 45

होता जसा गाव माझा
हल्ली तसं भासत नाही
गावामधला पार सुद्धा
गजबजलेला दिसत नाही

सोशल मिडियाची किमया भारी
पोरं झालीये मग्न
नाही नोकरी, नाही धंदा
मग आयुष्य वाटतंय भग्न

नूसतच मेलं राजकारण
अन फक्त कुरघोडी
सत्तेसाठी काहिपण
साले करतात घरफोडी

खरंच होती नाती सुंदर
नव्हतीच कोणती हाव
आपण आहोत एक सारे
पवित्र असे हा भाव

भेटतील का हो माणसं तशी
ज्यांनी जपला खरा गांव
येतील का ते सुंदर क्षण
सांगा ना तूम्ही राव !