सोडून गेले सखे-सोयरे
अन् सैरावैरा घुमतो आहे
चैत्र मासाचा अंगी दाह
रात्रं दिनी सोसतो आहे
कसला हा आमचा गुन्हा
बळी मात्र ठरतो आहे
एका घोटभर पाण्यासाठी
रान शिवारी फिरतो आहे
उजाड केलेत घरटे आमचे
शांत कसला निजतो आहे
घ्यावा वाटतो क्षणभर विसावा
गर्द डहाळी शोधतो आहे
हरवलास मग स्वार्थ गर्दीत
आता उपकार करून बघ
शमेल जरासा आत्मदाह
घोटभर पाणी पाजून बघ
No comments:
Post a Comment