Monday, 18 July 2022

माझ्या कविता 60

 विठू तुझ्या अंगणी
जमला वैष्णवांचा मेळा
मुखी फक्त हरिनाम
कंठी तुळशीच्या माळा

सख्या काय तुझे रूप
असे लाजवते नभा
जन दर्शन देण्या तू
युगे अठ्ठावीस उभा

विसरुनी देहभान
आले वैष्णव तुझ्या दारी
इथे लाभे स्वर्गसुख
नित्य घडो आनंदवारी