Wednesday, 22 September 2021

माझ्या कविता 58

वारा धरी फेर
रिते होई ढग
सरी बरसती अशा
मिटे धरतीची धग

पसरे श्रावणाच्या सरी
ओलेचिंब पानं-फुलं
गाली हसते गोड 
धरणी मातेचं मुलं

इथे दाटली वनराई
जणू सोळा शृंगार
भीमा सागराची भेट
किती भूलवते फार

असा दाटतो ऊर
धुंद होते मन 
अन डोळ्यांनी टिपावा 
इथला नाजूक क्षण

Monday, 13 September 2021

माझ्या कविता 57

बेधुंद वासनेत मदमस्त नर
भोगतोय अबला, निर्भया
हे रोखण्यास पाप, फोडण्यास वाचा
मज वाटते आता
घ्यावी हाती लेखणी पुन्हा एकदा....

कसे फिरतात मोकाट किती
अगदी शुभ्र रंगाखाली
होण्यास शासन, उजेडात छत्रछाया
मज वाटते आता
घ्यावी हाती लेखणी पुन्हा एकदा....

किती व्हावेत बळी अजून
होईल समाज जागा?
पुसण्यास अश्रू, देण्यास आधार
मज वाटते आता
घ्यावी हाती लेखणी पुन्हा एकदा....

Thursday, 26 August 2021

मराठी कविता 56

अरे सांगा दादांनो
इतकं कसं खाली गेलात
अनितीच्या कागदापायी
माणूसकी विकून आलात

लहान होतो तेव्हा
माय नेहमी सांगायची
डाक्टर तर देवच असतू
अगदी कानावर बिंबवायची

ढेकणासारखं पिऊन रक्त
जणू सुस्त चढलीय अशी
मी तर म्हणतो याला
सुखाची झोपंच येते कशी

ज्याच्यासाठी कमावला पैसा
तो तरी 'बाप' म्हणतो का
सोडून जायचंय इथंच सगळं
एवढं तरी कळतं का

अरे विसरून कसं चालेल
तो कर्मपाढा वाचणार आहे
इथला बरं का हिशोब सारा
अगदी बिनचूक होणार आहे

माझं काहीच होणार नाही
 याच भ्रमात राहू नकोस
भोग चुकतो का कुणाला
एवढं मात्र विसरू नकोस
 

Friday, 20 August 2021

माझ्या कविता 55

तुझे मधाळ ओठ गोड गुलाबी
मला मकरंदाची ओढ प्रिये

तुझा जरी मखमली शालू हिरवा
मला लावण्याची भुरळ प्रिये

तुझा मधुर स्वर निखळ स्पर्श
मला श्रावणाचा ध्यास प्रिये

तुझ्या केसांमधला गजरा सुगंधी
मला मोगर्‍याचा छंद प्रिये

तुला कळावी एक आर्त हाक
मला मिळावी साद प्रिये

Saturday, 3 April 2021

माझ्या कविता 54

 सोडून गेले सखे-सोयरे
अन् सैरावैरा घुमतो आहे
चैत्र मासाचा अंगी दाह
रात्रं दिनी सोसतो आहे

कसला हा आमचा गुन्हा
बळी मात्र ठरतो आहे
एका घोटभर पाण्यासाठी
रान शिवारी फिरतो आहे

उजाड केलेत घरटे आमचे
शांत कसला निजतो आहे
घ्यावा वाटतो क्षणभर विसावा
गर्द डहाळी शोधतो आहे

हरवलास मग स्वार्थ गर्दीत
आता उपकार करून बघ
शमेल जरासा आत्मदाह
घोटभर पाणी पाजून बघ


Tuesday, 2 March 2021

माझ्या कविता 82

आप के आने से
अगर ये शाम हसीन होती है
तो हो जाने दो।

तरसती आँखे तुम्हे देखने से
अगर खुशी मे डूब जाए
तो डूब जाने दो।

आपको सीने को लगाने से
अगर दिल की आग बुझती है
तो बुझ जाने दो।

ये हसीन दिलरूबा इन्कार ना करना
अगर जलती है शमा दिल के मंदिर मे
तो जल जाने दो।

Sunday, 24 January 2021

माझ्या कविता 49

ए जिंदगी का सफर 
और कितने इम्तेहान लेगा।
क्या पता मिले खुशी 
या सिर्फ दर्द ही देगा।

यहां कौन समझता किसको
बस अपनी ही पड़ी है।
खुद को ठहरना सही
इस पर दुनिया अड़ी है।

प्यार मोहब्बत तो सिर्फ
दिखावा है जनाब।
मगर झूठे  इश्तिहारों में 
कई शामिल है नवाब।

गुमनाम गलियों में 
ना अपनेपन का एहसास है।
कभी छलकते दर्द के आंसू 
मगर कौन यहां देखता है।

बिखरते रंगो की होली 
अब कहां आती है।
मनाए हर पल खुशी से सब
ऐसी दीवाली कहां होती है।

हर एक बैठा अकेला 
मदमस्त अपने घोसलों में।
शायद मिले कोई ऐसा
जो जान डाल दे हौसलों में।

बस भी कर ए जिंदगी
यह दर्द सहा नहीं जाता।
खुशियों का पैगाम लाए
शायद वक्त कोई आता।

प्यार मोहब्बत बटें सबमें
जब मिले हाथों में हाथ।
कुछ बीते ऐसी रातें
जो गुजरे अपनों के साथ।