Wednesday, 22 September 2021

माझ्या कविता 58

वारा धरी फेर
रिते होई ढग
सरी बरसती अशा
मिटे धरतीची धग

पसरे श्रावणाच्या सरी
ओलेचिंब पानं-फुलं
गाली हसते गोड 
धरणी मातेचं मुलं

इथे दाटली वनराई
जणू सोळा शृंगार
भीमा सागराची भेट
किती भूलवते फार

असा दाटतो ऊर
धुंद होते मन 
अन डोळ्यांनी टिपावा 
इथला नाजूक क्षण

3 comments: