असे आयुष्य ऊन-सावली
दुःख जरी घनदाट
हवा कशाला क्षणभर विसावा?
सर करायचीय पाऊलवाट
वाट तशी गजबजलेली
कधी एकटी पडलेली
असतील किती सोबतीला?
वाटेत गुपितं दडलेली
वाट काहीशी नागमोडी
चढ-उतार वळणाची
कधी आनंदी, एकांत
लागते कसोटी आयुष्याची
पदोपदी फासे निराळे
भेटतील शिकारी, साव
भेदूनी मग चक्रव्यूह
साधायचायं प्रत्येक डाव
जिंकण्याचं बळ मिळावं
अन ज्ञानशक्ती अफाट
शौर्य भिनावं नसानसात
सुकर व्हावी पाऊलवाट
Tuesday, 27 September 2022
माझ्या कविता 63
Sunday, 28 August 2022
माझ्या कविता 62
असा बहरला
श्रावण मास
सजली धरणी
दव मोत्यांनी
पीकात दाटे
कोवळा मोहर
बाग उमलली
कळया फुलांनी
मुक्त प्रवासी
उनाड वारे
सह सोबती
खळखळ झरे
रान पाखरे
मंजुळ गाणे
मन हळवे
भुलून जाते
Saturday, 20 August 2022
माझ्या कविता 61
Monday, 18 July 2022
माझ्या कविता 60
विठू तुझ्या अंगणी
जमला वैष्णवांचा मेळा
मुखी फक्त हरिनाम
कंठी तुळशीच्या माळा
सख्या काय तुझे रूप
असे लाजवते नभा
जन दर्शन देण्या तू
युगे अठ्ठावीस उभा
विसरुनी देहभान
आले वैष्णव तुझ्या दारी
इथे लाभे स्वर्गसुख
नित्य घडो आनंदवारी
Monday, 13 June 2022
माझ्या कविता 80
घेशील झेंडा कोणताही
असेल तीच टोळी
बदल म्हणजे स्वप्न
हीच राजकीय खेळी
सारीपाटातील प्यादी
नाहक जाते बळी
भग्न आमची चुल
तिथे भाजते पोळी
अशी भिनवली नसानसात
निष्ठावंत ची गोळी
तिथे भयाण मृगजळ
इथे आयुष्याची होळी
तूच आहेस शिल्पकार
हे शिकवले वेळोवेळी
स्वराज्य विचार आपला
भर आनंदाने झोळी
Wednesday, 5 January 2022
माझ्या कविता 81
लंबे अरसे से निशब्द था।
लेकिन दिल की ये हकीकत
कलम से बयां करता हूं।
चलो आज मैं कुछ लिखता हूं।
यु तो किसी को दुख देना
मेरा मकसद ही नहीं।
पर कुछ समा है दिल में
उसे छुपाना जरुरी नहीं।
मिले कभी सुकुन के दो पल
अब दिल की खामोशी को
अपनी कलम से आवाज देता हूं।
चलो आज मैं कुछ लिखता हूं।
मैं हूं बस एक मुसाफिर
ढूंढता मंजिल नयी हर पल।
वो कितना भी भटक जाए रास्ता
बनी को बिगड़ना मेरी ख्वाईश नहीं।
मिले उन्हे उनकी मंजिल
बस ये दुवा बयां करता हूं।
चलो आज मैं कुछ लिखता हूं।
जी लो जिंदगी खुशी से अब
किसीको टोकना मेरा मकसद नहीं।
मैं ठहरा एक कलमवाला
दुनिया का सुकून मांगता हूं।
लंबे अरसे से निशब्द था।
चलो आज मैं कुछ लिखता हूं।