Wednesday, 26 March 2025

माझ्या कविता 75

किती कारणे अबोलाचे
कोडे काही कळले नाही
तुझ्या नि माझ्या बंधनाचे
धागे तसे जुळले नाही

गायले तुझेच सुरेख गाणे
सुर काही मिळले नाही
वेचायची होती काही फुले
बाग तशी फुलली नाही

विणायचे होते सुरेख घरटे
निखळ प्रेम खुलले नाही
दोन श्वासाचं अंतर बाकी
सोबतीने कटले नाही

आठवणींच्या पुस्तकांची
संगत मात्र सुटली नाही
अजूनही पाने चाळण्याची
वेळ कधी टळली नाही

No comments:

Post a Comment