असाच भेटला एक जण
म्हटला ऑर्डर आली का?
कुठवर बसला घासत
यंदा कायम होशील का?
जेवत्या ताटावरचा सवाल
असा जिव्हारीच लागला
उचललेला घास तसाच
फक्त तोंडामध्येच फिरला
त्याचे शब्द ऐकून
जणू काळीज सुन्न झालं
मागचं पाप अन् कर्मभोग
बाकी एवढं नक्की वाटलं
अजूनही लचके तोडणं
समाज काही सोडत नाही
नकोसं वाटलं तरीही
खेळ नियतीचा थांबत नाही
जीवन म्हणजेच संघर्ष
सांगणं जरी सोपं आहे
आयुष्याची करून राख
जगणं म्हणजे होप आहे
No comments:
Post a Comment