Wednesday, 15 April 2020

माझ्या कविता 40

नमन श्री गणेशा । कृपा करा मज देशा ।
संकट हे अपार । तारावे जी के ॥

देवा तुझीच लेकरे । आस लावती बापडे ।
कर उद्धार तयांचा । हेच माझे साकडे ॥

अशी भयंकर महामारी । बेतली आयुष्यावरी ।
सोड तयातूनी आम्हा । सांगावा काय दोष ॥

तुच असे ठायी । वंदन तुझ्याच पायी ।
ऐका आर्त हाक । एका पामराची ॥

जीवा लागे घोर । रात्रंदिन विचार ।
संकटात माझी । सर्व प्राणीजात ॥

साधू संत लिहती । ऐसी घटा येईल ।
जग बंदी होईल । काही काळ मास ॥

जरी असेल कर्म । वा तयांचे प्रारब्ध ।
होतील मुक्त सारे । दावा आम्हा मार्ग ॥

असा व्हावा साक्षात्कार । अवतार दिव्य पुरुष ।
करावे पापमुक्त । सकळ जना ॥

तेही तुझेच रूप । आनंदी प्राणीजात ।
येईल तो दिन । रामा म्हणे ॥

No comments:

Post a Comment