Sunday, 26 April 2020

माझ्या कविता 47

शिकुन सवरून माणूस सुद्धा,
उगाच चुकतो आहे.
पांघरून कापडं माणुसकीची,
पशुसारखं वागतो आहे.

अहंकाराचा चढवून चष्मा,
लोकशाही मारतो आहे.
कुसंस्काराची रुजवून बीजं,
हिंस्र पिढी घडवतो आहे.

मान-मर्यादा, शिस्त, आदर
फक्त किताबी दिसतो आहे.
करून पायमल्ली कायद्याची,
थोरामोठ्यांना नडतो आहे.

अन्याय, दडपशाहीच्या जोरावर,
गरिबांना झुकवतो आहे.
धन संपत्तीच्या मोहामध्ये,
सत्यधर्म विसरतो आहे.

न्याय, दया, शब्द संस्कारी,
कैक किताबी लिहिले आहे.
वेचावी रत्ने सुसंस्काराची,
जिथे सुप्त विचार घडले आहे.

No comments:

Post a Comment